सोशल मिडीयाचा वापर करताना दक्षता घेणे आवश्यक -पोलीस प्रशिक्षण केद्राचे प्राचार्य बी.जी.शेखर

 



निलेश 
अकोला,दि.23- माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात होत असून यामुळे सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. यासाठी सोशल मिडीयाचा वापर करतांना नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलीस प्रशिक्षण केद्रांचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी केले. ट्रान्सफॉर्मीग महाराष्ट्र प्रकल्पातंर्गत सायबर गुन्हयाविषयी जनजागृती अभियान कार्यशाळेचे आयोजन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री . शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर , अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, मुंबईच्या  बँकेचे साहायक उपाध्यक्ष निशीकांत उपाध्ये, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम. आर. इंगळे व जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे तसेच मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकत अली मिरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.सायबर गुन्हयाविषयी युवकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे असे सांगून श्री.शेखर पुढे म्हणाले की, नायजेरीयन फ्रॉड , बनावट संकेतस्थळ बनवून ग्राहकांची फसवणूक ,एटीएम कार्डचे विवरण फोनव्दारे विचारून फसवणूक करणे , ऑनलाईन लॉटरी चे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणे तसेच व्हॉटअॅप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमाव्दारे धार्मिक किंवा जातीय भावना दुखावतील असा मजकूर , व्हिडीओ ,अश्लील फोटो पोस्ट करणे यासारखे सायबर गुन्हे मोठया प्रमाणात होत आहे. यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. इंटरनेटच्या वापरामुळे संपुर्ण जग ऑनलाईन झाले असल्याचे सांगुन जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर म्हणाले की, सोशल मिडीया हे दुधारी तलवार असून याचे फायदयासोबतच नुकसान सुध्दा आहे. या सोशल मिडीयाचा आपण वापर कसा करतो यावर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.जनसामान्यात सायबर गुन्हयाविषयी जनजागृती करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांनी प्रास्ताविकातून सांगितले. बँकेचे उपाध्यक्ष निशीकांत उपाध्ये यांनी पॉवर पॉईंट प्रेझेटेंशनव्दारे नेट बँकींग तसेच मोबाईल बँकींगचा उपयोग करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली. इंटरनेट बँकींग 100टक्के सुरक्षित असून इंटरनेट बँकींगचा वापर करतांना कोणतीही भिती ग्राहकाने बाळगू नये. असे त्यांनी सांगितले. येत्या काळात मोबाईल बँकीगचा मोठया प्रमाणात वापर होणार आहे. तरी ग्राहकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक तथा पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी विलास पाटील यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यशाळेचे सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी प्रसार माध्यमाचे प्रतिनीधी , शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.ऑनलाईन फ्रॉड टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता--
ऑनलाईन व्यवहार करतांना सिक्यूअर्ड साईटचाच वापर करावा,ब्राऊझरवर पासवर्ड वापरतांना कधीही Auto Seve करू नये,तुमचा पासवर्ड कोणालाही सांगू नका.पासवर्ड वारंवार बदलण्याची सवय लावा.ऑनलाईन व्यवहार पुर्ण झाल्यास लॉग आऊट करायला विसरू नये.कोणतेही वर्तमानपत्र /वेबसाईटवर जाहीरात असेल की, आपण काही पैसे जमा करा आपणास नोकरी लावण्यात येईल तर आपली फसवणूक होवू शकते. आपण कोणत्याही व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे भरले तर आपण फसवणूकीस बही पडला आहात असे समजावे. ऑनलाईन व्यवहार करतांना शक्यतो सार्वजनिक संगणकाचा किंवा सार्वजनिक WiFi चा वापर टाळा. आपला मोबाईल क्रमांक,लकी क्रमांक म्हणून निवडल्याचे सांगून किंवा बक्षिसाचे आमिष दाखवून वेगवेगळया फी चे पैसे जमा करण्याचे सांगतात, त्यात आपली फसवणूक होते. अशा प्रकारांना बळी पडू नका. संशयास्पद आढळल्यास संबधीत बॅक व पोलीसांना कळवा.सोशल मिडीया वापरतांना घ्यावयाची दक्षता--

सोशल मिडीयाfacebook,Twitter ई. सोशल मिडीयाचे पासवर्ड,स्वत:चे जन्मतारीख किंवा स्वत:चे नाव किंवा मोबाईल क्रमांक ठेवू नये. मजबुत पासवर्ड ठेवावा.अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारू नका, अनोळखी मॅसेजला टाळा..Anti –Religious मेसेजेस फॉरवर्ड करू नका ते त्वरीत डिलीट करा. कोणच्याही धार्मिक जातीय भावना दुखावतील असे मजकूर ,व्हिडीओ, अश्लील फोटोपोस्ट करू नका किंवा फॉरवर्ड करू नये. कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लीक करू नका.अनोळखी व्यक्तीचे SMS/MMS/Whats app मेसेजला प्रतीसाद देण्याचे टाळा.आपले पाल्य इंटरनेटवर काय पाहत आहे यावर लक्ष ठेवा.प्रख्यात व्यकतीच्या नावाने अकाऊंट तयार करूण अनोळखी व्यक्ती तुम्हाला friend-request पाठवू शकते अशा वेळी खात्री करूनच प्रतीसाद दया, अन्यथा आपली फसवणूक होवू शकते.क्रेडीट/डेबीट कार्ड संबधी घ्यावयाची दक्षता--
बॅक खातेदारकांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की, आपली बँक आपणास कधीही एटीएम संबधी माहिती फोनवर विचारत नाही..जर कोणी फोनवर एटीएम क्रमांक आणी ओटीपी (OTP) विचारत असेल तर देऊ नका.एटीएम चा Pin लक्षात ठेवा तुमचे एटीएम कार्डवर, चेक बुकवर किंवा इतर ठिकाणी लिहून ठेवू नका.एटीएम मशीनचा वापर करतेवेळी आपण एकटेच असल्याची दक्षता घ्या.एटीएम पीनचा वापर करतांना कोणलाही दिसणार नाही याची दक्षता घ्या.एटीएम चा वापर करतांना काही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवा.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post