अर्धनग्न होऊन शेतकऱ्यांनी केला मुजोर शासनाचा निषेध... ,चक्रीधरणे आंदोलनाचा पाचवा दिवस. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद....


जिल्हा,प्रतिनिधि,मक़सूद अली,
यवतमाळ, बोन्डअळी ला प्रतिकारक्षम म्हणून बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना विकलेल्या BG 1 BG 2  वानावर बोन्डअळीच्या आक्रमणामुळे बुडीत निघालेल्या शेतकऱ्यांसाठी विधिमंडळात सरकारने जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार ची मदत सरसकट व विनाविलंब देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती,काँग्रेस ,मनसे, राष्ट्रीय युवा संघटन,शेतकरी संघटना,शेतकरी वारकरी संघटना,बेंबला कालवे संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या चक्री धरणे आंदोलनाच्या पाचव्या  दिवशी उमरखेड   विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन कास्तकारांना फकीर करणाऱ्या सरकारचा जाहीर घोषणा देत  निषेध केला.  दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे दोघेही सातत्याने शेतकरी विरोधी धोरण राबवत असून देशभरातील शेतकरी सत्तारूढ पक्षाच्या व्यापारी धार्जिण्या शहर केंद्री धोरणांनी भिकेला लागलेला आहे.शेती कशी चालवावी ,मुले कशी शिकवावी कुटुंबातील कुणी आजारी पडला तर काय करावे ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहेत.अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या .आज आंदोलनाला हिंगोलीचे खासदार श्री .राजीव सातव यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या शिकवणीनुसार भाजप सरकार विरोधात लढण्याची गरज आहे,आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारने पैश्याच्या बळावर कशा प्रकारे सत्ता विकत घेतली ,उद्योगपतींन कडून वाट्टेल तेवढा पैसा मिळवून निवडणूक जिंकण्याचे नवीन तंत्र भाजप सरकारने विकसित केले असून त्यांना शेतकऱ्यांच्या ,सर्वसामान्यांच्या समस्यांशी काही देणे घेणे नाही असे ते म्हणाले. किसान अधीकार अभियानाचे समन्वयक शेतकरी नेते अविनाश काकडे यांनी सप्रमाण शेतकऱ्यांचे शोषणाचे वास्तव सांगत शेतकऱ्यांचे नावे सत्तेवर आलेल्या या सरकारने शेतकऱ्यांचे सर्वाधिक शोषण केले असून केवळ जात,धर्म गोवंश या आधारावर समाजामध्ये फूट पाडून इंग्रजांचे धोरण राबवित असल्याचा प्रकार सरकार करीत असल्याचा आरोप केला.या प्रसंगी शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून प्रहार करत सरकारी शेती विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला,वेळप्रसंगी आरपार ची लढाई लढण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी नाहीतर हे सरकार शेतकऱ्यांना नागडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या प्रसंगी दिला.या आंदोलनाचे नेतृत्व खा.राजीव सातव,माजी आ.विजय खडसे,तातू देशमुख,अशोक बोबडे,प्रवीण देशमुख,अरुण राऊत,मनसेचे अनिल हमदापुरे,सुधीर जवादे,दिनेश गोगरकर,माधुरी अराठे,गजानन कांबळे,प्रवीण सूर्यवंशी,राम देवसरकर,संदीप हिंगमीरे,सुनील चव्हाण,साहेबराव कदम ,नंदकिशोर अग्रवाल,दादाराव शिंदे,वनमाला  ताई  राठोड,बालाजी आगलावे,रमेश चव्हाण,शिवाजीराव वानखडे,कय्याम नवाब,शिवाजी काळे,महेश कामारकर ,दत्तारावशिंदे,किसन वानखडे,दलितानंद खडसे, यासह मतदार संघातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मतदार संघातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post