![]() |
मुर्तिजापुर तालुक्या मध्ये 2014 पासुन राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक क्षेत्रात गाव पातळीवर विविध उपक्रम राबवणारी प्रथम एजुकेशन फाउंडेशन संस्थे अंतर्गत मुर्तिजापुर तालुक्यातील 75 गावा मध्ये लायब्ररी इंटरवेशन हा नावीन्य पूर्ण शैक्षणिक उपक्रम २०१७-१८ मध्ये राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गावा गावांमध्ये जाऊन आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यचा शैक्षणिक दर्जा वाढवि०याच्या उद्देशाने व मुलांना गट अध्यायानातून स्वयंअध्ययनाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने प्रथम संस्थे मार्फत तालुक्या तील 75 गावात विदयार्थ्यना टॅब च्या आधुनिक पध्दती अभ्यासाचे वळण लावण्यासाठी हा उपक्रम राबविल्या जात असुन यात इयत्त १ ली ते 8 वीच्या विदयार्थ्यना वॉर्ड नुसार , गली नुसार गट तयार करून रात्री गावातील माता पालक वर्ग व युवक वर्ग सहभागी होऊन मुलांना अभ्यासामध्ये मदत करत आहेत. सोबत मुलांकरीता मोफत साहित्य सुध्दा मोफत देण्यात येत आहे. त्याच बरोबर एक ते आठ या इयत्ते च्या मुलांचे गल्ली गल्ली नुसार पाच ते सहा मुलाचा गट तयार करुन् त्याची जवाबदारी पालकानी घेतली आहे। रोज मुले गटा मध्ये बसुन गट अध्यापन करतात सोबत शाळेचा अभ्यास करतात त्याच बरोबर टॅब ०दारे आधुनिक पध्दतीने विद्यार्थ्यना शिक्षण या लायब्ररी इंटरवेशन उपक्रमात शिकविल्या जात असल्याने या उपक्रमाचे पालक वर्गा कडुन स्वागत होत आहे , व मुलाचा गट अध्यापना मध्ये उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे , या उपक्रमासाठी संस्थेचे जिल्हा समन्वयक सुनिल इंगळे महादेव कुरवाडे ,अजय इंगळे,जयश्री पवार, भावेश हिरुळकर, गणेश ढ्वळे. आदी परिश्रम घेत आहे.