- क केंद्रांवर आयुक्त व जिल्हाधिकारी यांची इतर अधिकार्यांसह भेटी.
- नर्दोष मतदार याद्या बनविणे हा आयोगाचा निर्धार
मुर्तीजापुर :- लोकसभा विधानसभा आणि इतर निवडणुकीकरिता मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी दि.२ व दि.३ पर्यंत नोंदणीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. मतदान प्रक्रिये मध्ये मतदात्यांचा सक्रिय सहभाग लोकशाही करिता ही पूरक बाब असून जनजागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदात्यांनी या प्रक्रियेमध्ये सरळ आणि सकारात्मक आपला सहभाग नोंदवावा. याकरिता दिनांक २ व ३ रोजी संपूर्ण तालुक्यात शेवटची मतदार नोंदणी प्रक्रिया राबविल्या जात असून या प्रक्रियेत सर्वच स्तरातील अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आलेले आहे. मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघात ३८१ मतदान केंद्र असून या मतदान केंद्रांमध्ये ग्रामीण भागात बाराशे मतदार आणि शहरी भागात चौदाशे मतदार असलेले मतदान केंद्र आहेत. तर 20 मतदान केंद्र हे नवीन प्रक्रियेत असून अतिरिक्त भाग म्हणून याला परवानगी मिळावी करिता अहवाल पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे या वीस मतदान केंद्रांना जर मंजुरी मिळाली तर मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघातील एकूण मतदान केंद्रांची संख्या ४०१ होणार आहे. त्यामध्ये जवळजवळ ४४ झोनल अधिकारी असून या महिन्यात सात ते आठ तारखेपर्यंत आचार संहिता लोकसभे करीता लागण्याची शक्यता आहे. मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये जवळपास दीड लाख छायाचित्र नसलेली नावे मतदार यादी मध्ये समाविष्ट होती. ती आता पंचवीस ते तीस हजारावर आल्याची आणि यामध्ये काही कृष्णधवल तसेच रंगीन आणि काही छायाचित्रं नसलेले अशा प्रकारच्या मतदार याद्यांमध्ये त्रुटी होत्या. परंतु हे सर्व आता रंगीन छायाचित्रांमध्ये येणे करिता प्रयत्न सुरू असून या तीन दिवसात जवळजवळ दहा हजार छायाचित्र अपलोड करण्यात आल्याची माहिती माहिती आज येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.लोकशाही प्रक्रियेत मतदार हा सर्वात महत्त्वाचा आणि सन्माननीय घटक आहे. त्यामुळे मतदात्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. वय १८ वर्षे पूर्ण आहे त्यांनी आज आणि उद्या आपल्या भागातील मतदान केंद्रांवर जाऊन नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केले. यावेळी मूर्तिजापूरचे तहसीलदार पवार यांनी सांगितले की, लोकांमध्ये जनजागृती करिता रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि महिला दिनी विविध कार्यक्रम ठेवून मतदार जागृती करण्यात येणार आहे. तसेच या दोन दिवसात विशेष बाब म्हणून आयुक्तांपासून तर सर्वच विभागाचे अधिकारी, महसूल सह इतर सर्व विभागाचे अधिकारी या केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. आणि ते देखील यामध्ये जागृती करणार आहेत.निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त प्रमाणात मतदारांनी सक्रियेत सहभागी होण्याकरता प्रयत्न चालविल्याचे त्यांनी सांगितले.या मोहिमेत दि.२ रोजी एकूण ४१५ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती नायब तहसिलदार मिसाळ यांनी दिली.
- आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिली भेट
मतदार नोंदणी विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी आज आयुक्त श्री.पियुष सिंह, जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी श्री.अभयसिंग मोहिते यांनी अनेक मतदान केंद्राला भेटी देऊन माहिती जाणून घेतली व मार्गदर्शन केले.
SHARE THIS