मूर्तीजापूर :- जयनारायणजी बुब नगर परिषद माध्यमिक शाळेत डिजीटल कक्षाचे व शुद्ध थंड पेयजल यंत्राचे उद्घाटन न.प. उपाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती देवतेच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
जयनारायणजी बुब नगर परिषद हिन्दी माध्यमिक व ऊर्दू कलाच्या विद्यमाने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विविध स्पर्धेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. .समारंभाला न.पा.उपाध्यक्ष सचिन देशमुख,कमलाकर गावंडे, नगरसेवक सुनील पवार,कैलास महाजन,गजानन नाकट,लाला डाबेराव,रवि इंगळे, मो.युनूस,अफताब शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्ताविकातून मुख्याध्यापक अर्जुन मोरे यांनी सांगितले की, पटसंख्या वाढविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात येतील .
काही वर्षांपूर्वी सदर शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला होता. येथील स्व.वसंतराव नाईक मराठी मुलांची व राणी लक्ष्मीबाई मराठी मुलींची शाळा विस्थापित करण्यात आली आहे.पण आता सदर जे बी. शाळा कात टाकत असून शिक्षकांचे परिश्रम आणि सद्यस्थितीत तरुण नगरसेवकांच्या व नगर परिषदेच्या सहकार्यातून गतवैभव प्राप्त करीत आहे.शाळेत डीजीटल कक्षाच्या आणि शासनाकडून मिळालेल्या पेयजल यंत्र उद्घाटनामुळे शाळेचा नावलौकीक वाढुन पटसंख्या वाढण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सतिश खडतडकर,सोहेल अहमद सर,मो.इद्रीस सर,पर्यवेशक मो.मकसुद ,अनिल इंगळे,नईमउल्ला,जाकीर हुसैन,प्रमोद गाजरे,संजय जाधव, अब्दुल सईद, विद्या खंडारे, पाठक मॅडम,स्वाती लांडे,किरण मॅडम, गावंडे, शिक्षकेत्तर कर्मचारी अनिल गटवाले,संतोष जवंजाळ ,श्याम करमोळे, श्याम गावंडे,आशिष थंडवार यांंनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रभाकर सिरसाट यांनी केले. आभार सुरज तिवारी यांनी व्यक्त केले.
