मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती



  • 26 जानेवारीपासून  काँग्रेस कमिटीचे साखळी उपोषण

 मुर्तीजापुर :- मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे ग्रामीण भागातील रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर होतो परंतु काम कोणी करावे या विषयावर एकमत होत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात जिल्हा परिषद ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे कामे होण्यास मार्ग सुकर होत नाही  जनतेला विद्यार्थ्यांना तसेच ग्रामवासीयांना जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे जिल्हा परिषद देणारे ग्रामीण रस्ते जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत वादामुळे निधी मंजूर असून आर्थिक लाभामुळे बऱ्याच वर्षापासून खोळंबले आहे परिणामी दोघांच्या भांडणात जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्तीसाठी निधी खर्च न केल्यामुळे सदरचा निधी परत गेल्याच्या घटना प्रसिद्धी झोतात आलेले आहेत जिल्हा परिषद अंतर्गत जोडरस्त्याचे पाच वर्षापासून कोणतेच दुरुस्तीचे काम न झाल्यामुळे तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ग्रामीण  भागातील जनतेला  जीवघेणा प्रवास करावा लागत आहे जिल्हा काँग्रेस कमिटी मूर्तिजापुर तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस व सर्व काँग्रेसचे सेल यांनी   16 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या निवेदनात प्रशासनाने प्रकरणी गंभीर दखल न घेतल्यास काम समाधानकारक न  झाल्यामुळे दिनांक 26 जानेवारी पासून उपविभागीय कार्यालय समोर सकाळी अकरा ते पाच साखळी उपोषणाचा पहिला टप्पा सुरु होणार आहे याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असे लेखी पत्र आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले या पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबन डाबेराव बंडू  डाखोरे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बाजार शहराध्यक्ष दिनेश दुबे माजी शहराध्यक्ष धीरज अग्रवाल सेवादल संघटक अशोक दुबे युवक काँग्रेस अध्यक्ष शहाबुद्दीन राजू जोगदंड रोहित सोळंके सुनील वानखडे अनंत कुमार पांडे अमोल लातूरकर गोपाळ  बोले संजय गुल्हाने बद्री प्रसाद दुबे उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post