रमाईचा एकपात्री प्रयोगाने सभागृह गहिवरले



  •  सौ.लता डोंगरे यांनी विवेकानंद व्याख्यान मालेत सादर केला एकपात्री प्रयोग

मुर्तिजापूर :- माहेर ते सासर असा रमाबाईच्या जिवनातील संघर्ष अनेक ह्रदय द्रावक प्रसंगांसोबतच, रमाबाईंच्या जीवनात बाबासाहेबांचे असलेले महत्त्व, त्यासोबतच संसाराची होणारी परवड, बाबासाहेबांचे वाढत चाललेले कार्य या संदर्भात सौ. लताताई डोंगरे यांनी आपल्या जिवंत अभिनयने  एकपात्री प्रयोगात रमाबाई जिवंत साकारत सभागृहाच्या डोळ्यात अश्रू आणले. आपल्या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण स्वामी विवेकानंद विचार मंचच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफतांना त्यांनी केले.यावेेळी त्यांचे सोबत पती प्रा.   चंद्रशेखर डोंगरे,लंडन येेथील सहकारी सोहनलाल गिंंडा,मुख्याध्यापक श्रीमंत सुदामे पुलगाव उपस्थित होते. 

 प्रभाकर दुपारेे लिखित व चंद्रसेन डोंगरे दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय पातळीवर मलेशिया व लंंडन येथे सादर झालेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावरील एकपात्री नाट्यप्रयोग "रमाई" हा सौ.लताबाई डोंंगरे यांनी राधामंगलम  मंगल    कार्यालयात आयोजित व्याख्यानमालेत सादर केला. त्यांच्या हस्ते विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  प्राध्यापिका सुुनिता दंंडे यांनी प्रास्ताविक आणि पाहुुण्यांंचा परिचय करून दिला. रमाईच्या माहेरची कठीण परिस्थिती, त्यांंना करावा लागलेेला प्रचंड संघर्ष, दोन भावंडे सोडून आई-वडिलांंचे निधन, कुटुंबाचा आधार तुटल्यानंतर मुंबई येथे मामांंनी केलेले संगोपन व वयाच्या नवव्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकून सासरच्यांचा निधन,  बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी, मुलाचं पैशाअभावी निधन हे सर्व सहन करत रमाईंनी बाबासाहेबांना भक्कम साथ दिली.


बाबासाहेबांचे कार्यातुन  रमाबाईंना समाधान मिळत होतं. लताबाई डोंगरे यांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर मांडले. सुखी संसाराचे स्वप्न या देशातील कोट्यावधी जनतेचे पूर्ण झालेले नसताना, स्वतःच्या सुखी संसाराचा मोह त्याग करत हिंदू समाजाकरता केलेल्या कार्याचा म्हणजेच बाबासाहेबांनी डोळे नसलेल्या समाजाला, दृष्टी दिली, मुक्या समाजाला वाणी दिली, काळाराम मंदिर, महाड सत्याग्रह, आंदोलने आणि बाबासाहेबांचा सत्कार हे सर्व प्रसंग त्यांनी उत्कृष्टरित्या सादर केले. बाबासाहेबांच्या मांडीवर ज्यावेळेस रमाई आपले डोळे मिटले तो प्रसंग अत्यंत भावनिक असा होता आणि संपूर्ण सभागृहाच्या डोळ्यात यावेळी अश्रू आले.सभागृहात स्तब्ध शांंतता, जिवंत सादरीकरण आणि रमाईने मिटलेले डोळे असा दिर्घकाळ लक्षात राहणारा एकपात्री प्रयोग लता डोंगरे यांनी सादर केला.

मंचावर माईक व लाईट शिवाय काहीही नसताना  एक चमत्कारीक सादरीकरण  म्हणजे अभिनय व संवाद यांचा अपूर्व मिलाफ होता अशी प्रतिक्रिया एका जाणकार श्रोत्यांने व्यक्त केली. नाट्यक्षेत्रातील अशाच एका श्रोत्याने हे केवळ पाठांतर आणि कृत्रिम अभिनय नाही तर प्रत्यक्ष रमाईचा संचार लता डोंगरे यांच्यात झाला असल्याचे वाटत होते अशी प्रतिक्रिया दिली . कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. अनेकांनी रमाई बरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . लता किडे यांनी केले . प्रबोध बापट यांच्या वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post