जीवन प्राधिकरण पाइप लाईन वरील व्हॉल्व्ह लिक ; पाण्याची प्रचंड नासाडी


मूर्तिजापूर :- तालुक्यात एकीकडे दुष्काळ सदृश्य स्थिति निर्माण झाली असताना जीवन प्राधिकरणाच्या जल वाहीन्यांवरील व्हॉल्व्ह अनेक ठिकाणी लिकेज असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. हा प्रकार मूर्तिजापूर भातकुली रस्त्याने नित्याचाच झाला असला तरी शनिवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व्हॉल्व्ह लिक होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.
     आधीच दुष्काळी परिस्थिती त्यातही पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खोल गेली आहे अशा परीस्थितीत पाण्याची बचत करण्याची काळजी घ्यावी लागत असताना जीवन प्राधिकरणाच्या जल वाहीन्यांवरील व्हॉल्व्ह लिकेज होणे हे प्रकार नेहमी पाहायला मिळतात. तालुक्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने  दुष्काळी परिस्थितीवर कशी मात करायची हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
      कृषी उत्पन्न बाजार समिती समोर जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचे तीन व्हॉल्व्ह आहेत आज सकाळपासूनच यातील एक व्हॉल्व्ह लिकेज असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होताना लोकं उघड्या डोळ्यांनी बघत होते लिकेज येवढा प्रचंड होता की, आजूबाजूला पाणीच पाणी साचले होते. नंतर ही बाब जीवन प्राधिकरणच्या लक्षात आणून दिल्याने या व्हॉल्व्हची दुपारी उशिरा दुरुस्ती करण्यात आली.

  • वारंवार हे प्रकार घडत राहतात ही गोष्ट खरी असली तरी हा प्रकार आपोआप होत नाही. परीसरात राहणारे लोकं पाण्यासाठी व्हॉल्व्ह खोलून सैल करतात. आज बाजूच्या नविन घरकुल वसाहतीत राहणाऱ्या लोकांनी पाणी भरण्यासाठी रात्री तो व्हॉल्व्ह सैल केल्याने पाण्याची नासाडी झाली. ते लगेच दुरुस्त करण्यात आले.
  • एम. आर. बोबडे
  • उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण, मूर्तिजापूर

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post