- उपविभागीय अधिकारी यांनी शेतक-याच्या दारी जावून स्विकारले निवेदन
जय प्रकाश रावत
मूर्तिजापूर :- येथील तहसील कार्यालयासमोर शेतकरी व शेती व्यवसाय संबंधित विविध मागण्या शासनाने मंजूर करावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेतकरी नेते रविकांत तुपकर तसेच प्राचार्य श्रीकांत तिडके, प्राचार्य रामभाऊ रणबावळे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रगती शेतकरी मंडळाचे राजू वानखडे तसेच विजय गावंडे, प्राचार्य रणबावळे,राहुल राठी यांनी आपले विचार व्यक्त केले. तर या धरणे आंदोलनाचे महत्त्व विशद करताना प्राचार्य श्रीकांत तिडके यांनी सांगितले की, "कालचे मुके आज बोलू लागले" शेतकरी आता एकजुट होत आहे. त्याचा आवाज दाबणे शक्य नाही. शासनाकडे योगी आहे तर शेतकरी हे कर्मयोगी आहेत. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यावर सर्वांचं पोट भरते. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यायलाच पाहिजे असे विचार व्यक्त केले. यावेळी रविकांत तुपकर यांनी आपले परखड विचार मांडतांना शेतकऱ्यांचे आंदोलन हे राजकीय आंदोलन झालेच पाहिजे. आम्ही शासनाच्या विरोधातच आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकता ज्याप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांनी देखील एकत्र यावे. आता या शासनाला मत नाहीतर शिवामृत पाजा. जिल्हाधिकारी कार्यालयाला संपूर्ण विदर्भात घेराव घालू. आम्हाला नक्षलवाद्याच्या रस्त्यावर घेऊन जाऊ नका. आमच्या मालाला योग्य तो भाव द्या. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले. धरणे आंदोलन प्रगती शेतकरी मंडळ , जनमंच , स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ,न्यु.यंग फाँर्मस् ग्रुप यांनी केले होते. संचलन प्रा.गोरखेडे यांनी केले .धरणे आंदोलनाला शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते. आंदोलन यशस्वी पार पाडण्यासाठी अरुण बोंडे, राजु वानखेडे,देविदास बांगड,मधुकर इंगोले, कैलास साबळे,संदीप मानकर, मुन्ना नाईकनवरे, शरद बंग यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------------------------------------------मुर्तीजापुर येथील अधिकारी-- पालकमंत्र्यांचा जनता दरबारी ------------------------------------------------------------------------- मूर्तिजापूर येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलन दरम्यान मूर्तिजापूर तहसीलदार , उपविभागीय अधिकारीअकोला येेेथे पालकमंत्री यांच्या जनता दरबारात गेल्याने उपस्थित नव्हते म्हणून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मूर्तिजापूर तहसील कार्यलयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले जो पर्यंत जबाबदार अधिकारी निवेदन स्वीकारणार नाही, तो पर्यंत कार्यालयासमोरून न उठण्याचा निर्णय रविकांत तुपकर यांनी घेतला होता. त्यानंतर निर्णय रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन मागे घेऊन आठ दिवसात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकाराव अन्यथा मूर्तिजापूर तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय पेटवून देण्याचा रविकांत तुपकर यांनी इशारा दिला होता.उपविभागीय अधिकारी यांनी अकोला येथून आल्या नंतर शेतकरी राजू वानखेडे याच्या दारी जावून निवेदन स्विकारले व शेतकरी बांधवांचा सन्मान राखला.