जिलहाधयक्ष, फुले आंबेडकर विद्ववत सभा परिषदेचा एल्गार
मुतिजापुर प्रतिनिधी :- भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात फुले आंबेडकर विद्ववत सभा कार्य करीत आहे, एस सी, एसटी,व्ही.जे.एन.टी.ओबीसी प्रवर्गातील शिक्षित बुद्धीजीवी वर्गाला संघटीत करून शैक्षणिक, सामाजिक, आथिँक न्यायासाठी आंदोलन उभे करणे विद्ववत सभेची मुख्य भूमिका आहे. त्यासाठी रस्तावर उतरून प्रसंगी न्यायालयीन लढा देऊन प्रखर आंदोलन उभारल्या जाणार, असे प्रतिपादन फुले आंबेडकर विद्ववत सभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितल.
शासकीय सेवेमधून भरण्यात येणाऱ्या जागा हया कंत्राटी पद्धतीने न भरता त्या पुर्णवेळ कायमस्वरुपी भरण्यात याव्यात, सवौंना एकसमान शिक्षण मोफत मिळावे, सीबीएससी शिक्षणपद्धती सवै प्रकारच्या शाळेत राबविण्यात यावी बेरोजगारांना रोजगार मिळणे हा संवैधानिक अधिकार आहे बेरोजगार तरुणांना साठी रोजगार, नोकरीची हमी देण्यात यावी, मागासवर्गीय यांच्या नोकरीतील अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करणार, उचचशिक्षणातील पदे तातडीने भरण्यात यावी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज अहिल्याबाई होळकर, गाडगे महाराज, संत कबीर, संत रविदास महाराज, कमैवीर भाऊराव पाटील यांचा अभयासक्रमात समावेश करण्यात यावा, भारतीय संविधानाचा अभ्यास इ. ५ व्या वगौपासून अभयासक्रमात समावेश करण्यात यावा, सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे.
पदवीधर अंशकालिन कमैचा-यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे, ३जानेवारी क्रांतीसावित्रीबाई फुले जयंती दिन हा स्त्री शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन कायमविनाअनुदानित धोरण रद्द करण्यात यावे, जुनी पेंशन योजना सरसकट लागू करण्यात यावी, घड्याळी तासिका शिक्षकांना १०००,रु तासिका किंवा ३०.००० रु मासिक मानधन देण्यात यावे. याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या मागण्याच्या पुतैतेसाठी आंदोलक भुमिका घेऊन शासनावर दबाव आणला जाणार असल्याचे प्रा विजय आठवल यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेत फुले आंबेडकर विद्ववत सभेच्या सचिव प्रा प्रमिलाताई बोरकर, कोषाध्यक्ष प्रा. बाळकूषण् खंडारे, सदस्य प्रशांत वरठे, प्रा. एल.डी. सरोदे, दिलीप सरदार,सुनील वानखडे, दिपकराज डोंगरे, बी. जी. इंगळे, रामेश्वर जामनीकर, संजय तायडे, सुनील सरोदे, सुनील डोंगरदिवे, सुनील पडिंत, राहुल रोकडे, इत्यादी उपस्थित होते.
