इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा शहरात भीमराष्ट्र बहूउदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दि.1 जानेवारी रोजी सकाळी भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
पोलिस निरीक्षक माधवराव गुंडीले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मायक्रोकॉमचे संचालक प्रा.युसुफ मुल्ला हे होते. या वेळी महार रेजिमेंट मध्ये सेवा केलेले सेवानिवृत्त सैनिक भीमराव निवृत्ती कांबळे, सहदेव गायकवाड, मारुती कांबळे, सिद्धार्थ कांबळे, दत्तू कांबळे, मोहन कांबळे,सुधाकर कांबळे, गोरख कांबळे, विश्वनाथ कांबळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. युसुफ मुल्ला यांचे भाषण झाले.
या कार्यक्रमास भीमराष्ट्र ग्रुपचे अध्यक्ष सचिन माने, बाळासाहेब माने, प्रकाश कांबळे, शाक्यदीप कांबळे, अशोक बनसोडे, अविनाश कांबळे, शाक्यदीप कांबळे, बाबुराव गायकवाड, गोकुळ कांबळे, तम्मा सिंघमशेट्टी, नागेश भालेराव, शिवानंद सूर्यवंशी, गौतम सूर्यवंशी, राहुल सरपे, निजाम व्हताळे, संजय सरवदे, चेतन गायकवाड, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
