1
लोहारा/प्रतिनिधी :-/लोहारा तालुक्यातील अचलेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन
समितीच्या अध्यक्षपदी बालसिंग बायस तर उपाध्यक्षपदी मल्लिनाथ कुंभार यांची निवड करण्यात आली आहे.
अचलेर येथील जि.प.प्रा शाळेत शालेय व्यवस्थापन समिती नवनियुक्त सदस्याची बैठकमुख्याध्यापक कृष्णा खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
2
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी गोविंद हरवाळे, नागनाथ शिवपुरे, विनायक उपासे, देवसिंग बायस, राजेंद्र पाटील, अब्दुल शेख, कविता बायस, शुभांगी सोलंकर, सुकेशनी मलकुंदे, मिना हराळे, रकमा माने, यांची निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक कृष्णा खंडाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य अनंदसिंग बायस, गुरुसिंग बायस, योगीराज रामशेट्टी, मल्लिनाथ आष्टगे, सुरेश खंडाळकर, यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
