डिझेलची बचत प्रत्येकाची नैतिक जबाबदारी एक,- एक थेंब मूल्यवान - परीवहन अधिक्षक ठाकरे


मुर्तीजापुर :- डिझेल हे खनिज असून एसटी महामंडळाला सर्वात जास्त डिझेल लागते.संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या १६००० बसेस धावतात यावरुन लाखो लीटर डिझेल लागते. डिझेलची बचत ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असून एक एक थेंब मूल्यवान आहे.

चालकांच्या आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक गाडीची व्यवस्थित दुरुस्ती, देखभाल केल्यास डिझेलचा एकही थेंब गळणार नाही याची काळजी घेतल्यास याचा महामंडळाला मोठा लाभ होतो. एस.टी. बस ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे असे विचार एस.टी. महामंडळाचे विभागीय वाहतूक अधीक्षक  योगेश ठाकरे यांनी   व्यक्त केेले.

मूर्तिजापूर येथील बस आगारात दि१६/१/२०१९ ते १५/२/२०१९ पर्यंत आयोजित इंधन बचत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या इंधन बचत कार्यक्रमाचे उद्घाटन मा.पी.एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकातून  मुर्तिजापूर आगाराला मागील वर्षी ५२.७७ चे बचतीचे लक्ष्य देण्यात आलेले होते.मुुुर्तिजापूर आगाराने ५१.७५चे उद्दिष्ट गाठलेले आहे.

 तर यावर्षी ५३ टक्के एवढे लक्ष कीलोमीटर पर 10 लिटर(KPTL) प्रमाणे देण्यात आलेले आहे. हे लक्ष्य आम्ही जरूर पूर्ण करू असा आशावाद याबाबत माहिती देतांंना बँकेचे संचालक विजय साबळे यांनी व्यक्त केला. तर मुर्तीजापुर एस.टी.बस आगाराचे व्यवस्थापक प्रवीण अंबुलकर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

यावेळी संतोष घोगरे, अनुप तडसे, सुधीर पखाले,चालक वसीमोद्दीन,चालक जावरकर, सलिम कुरेशी, लिपिक पांडे, गोदावरी ठाकरे, मुळे, स्वाती चौधरी, योगिता तिवारी यासह इतर महामंडळाचे कर्मचारी, तांत्रिक, कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post