धानुरी व माडज येथे प्रेरणा सुक्ष्म उद्योग सल्लागार संघ यांच्या सहकार्याने उमेद आठवडी बाजार सुरु


लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील  धानुरी व उमरगा तालुक्यातील माडज येथे आठवडी बाजार भरत नव्हता यांना बाजार साठी लोहारा व नारंगवाडी येथे जावे लागत होते. येथील ग्रामस्थांची पैशाची व वेळेची बचत व्हावी हा चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवुन तुळजापुर येथील प्रेरणा सुक्ष्म उद्योग सल्लागार संघ व प्रगती ग्रामसंघ व समिक्षा ग्रामसंघ  व धानुरी व माडज ग्रामपंचायतच्यावतीने ग्रामस्थांची जनजागृती करुन उमेद आठवाडी बाजार सुरु करण्यात आला आहे.
या धानुरी येथील उमेद आठवाडी बाजार चे उदघाटन अजित व्यंकट साळुंके तर माडज येथील उदघाटन सरपंच विजय बाचणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शब्बीर गवंडी व भगवान अंकुश यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी राम पाटील, उमेद अभियाण तालुका अधिकारी भगवान अंकुश, प्रेरणा सुक्ष्म उद्योग सल्लागार संघाचे अध्यक्ष शब्बीर गवंडी, सचिव रेणुका नाईकवाडी, सरपंच गणेश जाधव, विस्तार अधिकारी कलबडवाड, विस्तार अधिकारी कांबळे, अमोल कासार, उद्योग सल्लागार  धनराज गाडेकर, ज्योती बिराजदार, सरपंच वर्षा पवार (तिर्थ खुर्द), श्रीदेवी शिंदे, सी.सी.अंतेश्वर माळी, नंदन थोरात, किशोर हुंडेकर, सचिन गायकवाड, नाईक, यशवंत बुवा, वंसत साळुंके, यांच्यासह महिला व नागरीक, व्यापारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post