नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी - आमदार हरीष पिंपळे


 मुर्तीजापुर :- नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांनी सातवा वेतन आयोग लागू करा, पाणीपुरवठा आरोग्य विभाग याठिकाणी शासनाच्या धोरणानुसार वर्ग 3 च्या पदावर पदोन्नती देणे, सफाई विभागाची  ठेका पद्धती बंद करणे, संवर्ग कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पदावर नियुक्ती देणे  या व इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडल्याने आज नवीन वर्षाची सुरुवात नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने झाली.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे शहरातील स्वच्छतेसह सर्व कामे ठप्प झालीत्र यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करण्याची पाळी आलेली आहे. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, नगर परिषद संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात बंद पुकारण्यात आलेला आहे. मुर्तीजापुर नगरपरिषदेच्या १७२ कर्मचाऱ्यांनी यात सहभागी होत नगर परिषदेच्या आवारात धरणे दिले.


नगरपरिषद कर्मचाऱ्यांची येथील आमदार हरीष पिंपळे यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या समजून घेतल्या. आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या मार्गी लावण्याकरिता आम्ही त्यांच्या पाठीशी असून समस्या व मागण्यांसाठी तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मी येण्यास तयार आहे असे भरीव आश्वासन दिले. यावेळी कमलाकर गावंडे. शेख इम्रान  नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, गजानन नाकट, मुख्याधिकारी विजय लोहकरे, नासिरभाई, बबलू भेलोंडे, उंटवाल आदींची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post