४ डिसेंबर ला यवतमाळ मध्ये होणार जन संघर्ष यात्रेचा शुभारंभ


यवतमाळ :- केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांना सर्वच क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला संकटाचा सामना करावा लागत असून अश्या निर्दयी शासनाच्या विरोधात जन संघर्ष यात्रा दिनांक 4 डिसेंबर रोजी *यवतमाळ येथे कळंब मार्गे मोटार सायकल रॅली द्वारे* येत असून सकाळी 11 वाजता जाहीर सभा संपन्न होणार आहे. या यात्रेत प्रामुख्याने  लोकसभेचे गट नेते तथा राज्याचे प्रभारी खा मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा अशोकराव चव्हाण, राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,  हर्षवर्धन पाटील,  आरिफ नसीम खान, विजयबाबू दर्डा,  शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, वामनराव कासावार, श्यामबाबू उमाळकर, विजयराव खडसे, यांचे सह राज्यातील काँग्रेस चे प्रमुख नेते व मान्यवर प्रामुख्याने उपस्तीत राहणार आहेत. शासनाने केलेण्या अन्याय व अत्याचाराचा पाढा या वेळी वाचण्यात येणार असून यवतमाळ येथे होणाऱ्या या सभेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे,
या यात्रेला काँग्रेस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहान्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आ डॉ वजाहत मिर्झा यांनी केलेले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post