लोहारा तालुक्यातील 86 मतदान केंद्रावर निवडणुक विभागाकडुन अपंग मतदारासाठी रँम्पची व्यवस्था — तहसीलदार राहुल पाटील


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यात एकुण 94 मतदान केंद्र असुन त्यापैकी 86 मतदान केंद्रावर अंपग मतदारासाठी रँम्पची व्यवस्था करण्यात आली असुन, उर्वरीत 8 मतदान केंद्रावर व्यवस्था केली जाणार आहे, असे प्रतिपादन  तहसीलदार राहुल पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी उस्मानाबाद व तहसील कार्यालय लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तहसील कार्यालयाच्या सभागृहात दि.3 डिसेंबर रोजी जागतिक अंपग दिनानिमित्त अंपग मतदारांमध्ये लोकशाही प्रकियेबाबत जनजागृती कार्यक्रम घेऊन अंपग दिन साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल पाटील बोलत होते.


यावेळी प्रमुख म्हणुन नायब तहसीलदार रणजित शिराळकर,नायब तहसीलदार ए.के.वाघमारे,सा.बां. उपअभियंता शिवाजी माले,अदि उपस्थित होते.
यावेळी जागतिक अंपग दिनानिमित्त अंपग व्यक्तीना अंपग दिन 3 डिसेंबर मतदार असल्याचा अभिमान मतदानासाठी सज्ज मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट यांचे पत्रक वाटप करुन अंपग मतदारांची  जनजागृती करुन त्यांचा पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांनी सविस्तर माहिती सांगीतली.या कार्यक्रमास बलभिम विरुध्दे,मुस्तफा थानेदार, आदम शेॆख, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील अंपग मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post