स्वच्छ महाराष्ट अभियान (नागरी) अंतर्गत लोहारा नगर पंचायत येथे स्वच्छ भारत मिशन, डेटाल बनेगा स्वच्छ इंडिया क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा नगर पंचायत कार्यालयाच्या सभागृहात स्वच्छ महाराष्ट अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्वच्छ भारत मिशन, डेटाल बनेगा स्वच्छ इंडिया
याबाबत दि.4 डिसेंबर रोजी क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. ज्योतीताई दिपक मुळे होत्या तर प्रमुख म्हणुन उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड,टीम लिडर जागरण पहेलचे ओमप्रकाश सर
 (दिल्ली)स्वच्छता दुत अपसिंगे विजयकुमार (लातुर),
नगरसेवक श्रीनिवास माळी,नगरसेवक बाळासाहेब कोरे,नगरसेविका निर्मला स्वामी,नगरसेविका जयश्री कांबळे,नगरसेवक गगन माळवदकर, अदि, उपस्थित होते.
यावेळी लोहारा शहरातील नागरीकांना व महिलांना कचरा व स्वच्छतेबाबत ओम प्रकाश यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड व सुत्रसंचालन अमित बोराळे यांनी केले तर आभार  नगरसेवक श्रीनिवास माळी यांनी मानले. या कार्यक्रमास दिपक मुळे,शिवा स्वामी,हरी लोखंडे,गोरखनाथ नारायणकर, अंकुश नारायणकर,वंदना भगत,सुवन डोकले,आयुब हबीब शेख,कार्यालयीन अधिक्षक पि.पि.पोते, स्वच्छता विभाग प्रमुख अफजल शेख, सोमनाथ पालमल्ले,प्रा.
राजपाल वाघमारे, नवनाथ लोहार,दिलीप चव्हाण, गुलशन बागवान,बाळु सातपुते,पप्पु मुळे, श्रीशैल मिटकरी,उमाकांत सगट, मल्लीनाथ बिराजदार, यांच्यासह शहरातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post