इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा,लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे बालाजी विद्यालयात
राहुल पाटील मित्रमंडळ व सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने मोफत कर्ण व नेत्रदोष तपासणी शिबीर घेवुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला.
या शिबीराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या शीतल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती दयानंद थोरात, माजी सरपंच मंगेश पाटील, गोवर्धन मुसांडे, उदतपुरचे सरपंच माधवराव पाटील, लक्ष्मण बिराजदार, मधुकर यादव, उध्दव जोगी, मधुकर कोळी, बालाजी फुरडे, डॉ. मुजावर, मुन्ना शेख, अदि,उपस्थित होते.
या शिबीरात 22 कर्णदोष, 48 नेत्रदोष असलेल्या अशा एकुण 70 रूग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरातील रुग्णांना राहुल पाटील मित्रमंडळ व सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने कर्णदोष रूग्णांना श्रवण यंत्राचे वाटप व दहा नेत्रदोष रूग्णांचे शस्त्रक्रीया मोफत करण्यात येणार आहे. या शिबीरात डॉ. सुनिल मंडले, डॉ. दस्तीर मुजावर, डॉ. राजेश श्रीगिरे यांनी रूग्णांची तपासणी केली. या कर्यक्रमास परिसरातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
