मो घाखुर्द येथील जि.प.प्रा.शाळेत गोवर रूबेला लसीकरण मोहीम


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  गोवर,रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके यांनी लसीकरणाचे महत्व सांगितले. यावेळी शाळेतील 42 पैकी 33 विद्यार्थांना गोवर,  रूबेला लसीकरण देण्यात आले.या लसीकरणाची सुरुवात अरोग्यसेवक आर.ए.हजारे,अरोग्यसेविका के. एस. माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
श्रीमती ए.जी पटेल, एस.ए माने,चाँद मुजावर, जिजाबाई गोरे, कालिंदा मत्ते, रेखा दळवे, मनिषा गोरे, हमीद मुजावर, यांच्यासह नागरीक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे जगताप सर यांनी भेट देवुन पाहणी केली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post