मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेस ची आढावा बैठक सम्पन्न


मूर्तिजापूर :-  दि २३ डिसेंम्बर २०१८ रोजी स्थानिक तालुका काँग्रेस कमेटी च्या कार्यालयात मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेस ची आढावा बैठक सम्पन्न झाली असून सदर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी जिल्हा युवक काँग्रेसचे निरीक्षक तथा प्रदेश सचिव अब्दुल सलाम तर प्रमुख पाहुणे म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष निनाद मानकर व विधानसभा निरीक्षक इम्रान पटेल हे होते.तर कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेसचे चे विधानसभा अध्यक्ष मो.शहाबुद्दीन यांनी केले.मूर्तिजापूर विधानसभा मध्ये गाव तेथे युवक काँग्रेसची शाखा स्थापन करण्यात येणार असे विधानसभा अध्यक्ष यांनी सांगितले.येणाऱ्या काळात युवक काँग्रेस च्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमानावर युवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य युवक काँग्रेस च्या माध्यमातून केले जाईल असे मनोगत जिल्हा निरीक्षण यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष रोहित सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल तातुरकर  यांनी केले सदर कार्यक्रमात   सुनील वानखडे सेवादल अध्यक्ष, गणेश जोगडे,अनुराधा जोगडे,शुभम वानखेडे, विठ्ठलराव काकोडे, मो.दानिश, मो.फैजन, धीरज अग्रवाल आदींच्या संख्येने युवक काँग्रेसचे सदस्य गण उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post