इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यात मागील चार वर्षात विक्रमी विकासनिधी प्राप्त झाला असुन, लघुउद्योग, तीर्थक्षेत्र विकास, नागरी वस्तीसाठी विकासनिधी अशा विविध कामांसाठी निधी मिळाला आहे, यापुढेही जिल्ह्यासह शहराच्या विकासाठी आवश्यक निधी मिळवुन देण्याचे प्रयत्न करीन असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केले. उस्मानाबाद शहरातील (समर्थनगर) प्रभाग क्रमांक 10 येथे सिमेंट रोड बांधकामाचे उदघाट्न करुन आ.सुजितसिंह ठाकुर बोलत होते. यावेळी प्रमुख म्हणुन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, लोकसभा संयोजक नितीन काळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अँड.नितिन भोसले, भाजप मिडिया जिल्हाध्यक्ष धनजंय रणदिवे, सोशल मिडिया जिल्हा संयोजक संयोजक प्रविण पाठक, नगरसेवक योगेश जाधव, बालाजी कोरे, राहुल काकडे, दाजीअप्पा पवार, सुजीत ओव्हाळ, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, विस्तारक शिवाजी गिड्डे, मकरंद पाटील, नरेन वाघमारे,अदि उपस्थित होते. या भागातील रस्ता दुरावस्था झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, लोकसभा संयोजक नितिनजी काळे यांनी आ.सुजितसिॆह सुजितसिंह ठाकुर यांच्यामार्फत विशेष शहर विकास निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. या सिमेंट रस्त्याचे उदघाटन झाल्यामुळे समर्थनगर भागातील नागरीकांनी आ.सुजितसिंह ठाकुर यांचा यथोचित सत्कार करुन आभार मानले. या कार्यक्रमाचे आभार भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राहुल काकडे यांनी मानले. या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
