लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा,लोहारा विधानसभा क्षेत्रातील सीएम चषक कुस्ती स्पर्धेचे उदघाटन लोहारा तालुक्यातील धानुरी येथे भाजपा जिल्हा सरचिटणीस संताजी काका चालुक्य यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख म्हणुन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन कैलास शिंदे, उमरगा तालुकाध्यक्ष माधव पवार, लातूर जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, विस्तारक सिद्धेश्वर माने, माजी तालुका अध्यक्ष अनिल ओवांडकर, निलेश अंबुरे, सुनील सुर्यवंशी,
काशिनाथ घोडके, प्रवीण चव्हाण, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, सचिन सुर्यवंशी, प्रदीप सांगवे, अभिषेक पवार, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.