इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील मोघा खु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक अंपग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी गावचे पोलीस पाटील कुंडलिक पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपसरपंच गणेश मत्ते,गंगाराम भोंडवे,सोमनाथ मत्ते,अदि उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तानाजी जाधव,बब्रुवान मत्ते,करण सोमनाथ मत्ते,रमेश गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओ.एस पाटील यांनी दिव्यांगानी मतदान करुन मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा असे अवाहन केले.मुख्याध्यापक विकास घोडके यांनी जागतिक दिव्यांग दिन 1992 पासुन संयुक्त राष्ट्र संघात 3 डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणुन साजरा केला जातो,असे सांगीतले. यावेळी लेखिका, प्राध्यापिका,समाजसेविका हेलन केलर,ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल,सुवर्णपदक विजेता रनर आँस्कर पिस्टोरियस,संशोधक स्टीफन हाँकींग,फिरकीपटु बी.एस.चंद्रशेखर,नृत्य व अभिनयात किर्ती गाजवणाऱ्या सुधा चंद्रन यांची माहीती देवुन दिव्यांग बांधवांनी न खचता विविध क्षेत्रात कामगिरी केली आहे त्याचा आदर्श घ्यावा असे अवाहन विकास घोडके यांनी केले.यावेळी वैभवी दळवे या विद्यार्थीनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वि करण्यासाठी दिपक भोंडवे, हमीद मुजावर,अदिंनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास घोडके यांनी केले तर आभार माने एस ए यांनी मानले.या कार्यक्रमास विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोहारा जि.प.कें.प्रा शाळेत अपंगदिन साजरा
लोहारा शहरातीील जि.प.कें.प्रा.शाळेत अपंगदिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार रणजित शिराळकर होते.तर प्रमुख म्हणुन नायब तहसीलदार अतुल वाघमारे, मंडळ अधिकारी ए.आर.यादव, ऑफरेटर सचिन पांचाळ, बी.एल ओ अमोल जट्टे,संतोष माळवदकर,दत्ता माळी,झहिरोद्दीन शेख,प्रविण शिंदे,तानाजी दबडे,अदि उपस्थित होते.यावेळी नायब तहसीलदार यांनी अंपग मदरांना सविस्तर मार्गदर्शन केले. व तसेच अंपग मतदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तानाजी दबडे यांनी केले तर आभार सुरेश वाघमोडे यांनी मानले.या कार्यक्रमास ईसुब खुटेपड, अजीम शेख,व्यंकट कडबाने,आदम शेख,हैदर शेख, अनंत माळवदकर,बाबु रेणके,दत्ता रोडगे,मुस्तफा ठाणेदार,यांच्यासह अंपग मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
