इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- बसव अनुभव मंटप, आलूर येथे आज दि.2 डिसेंबर वार रविवार रोजी महाराष्ट्र बसव परिषद हिरेमठ संस्थान, भालकी-अनुभव मंटप प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली.
यामध्ये एकूण 12 शरण-शरणींनी परीक्षा दिली. 12 व्या शतकातील महात्मा बसवेश्वर व त्यांच्यासोबत असलेल्या शरणांनी लिहिलेल्या वचनावर आणि त्यांच्या अनुभवावर व तत्वावर आधारित असलेल्या विचारावरील प्रश्नोत्तर विध्यार्थी व अन्य शरण यांनी अतिशय आनंदाने सोडवून ही परीक्षा दिली.
बसव अनुभव मंटप, आलूरचे सर्व शरण व महाराष्ट्र बसव परिषद उमरगा तालुका अध्यक्ष हणमंतप्पा शंके आणि देशेट्टे आनंद यांनी या अनुभव मंटप परीक्षेचे आयोजन करून महात्मा बसवेश्वरांनी स्थापिलेल्या अनुभव मंतप व धर्म ग्रंथ वचन साहित्याचे प्रसार करण्याचा प्रयत्न या द्वारे केला जात आहे.
समता नायक जगतज्योतो महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प अनुभव मंडपाच्या सानिध्यातून केले जात असल्याचे प्रतिपादन हणमंतप्पा शंके यांनी केले आहे.
