इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद व चाईल्ड-लाईन मुलांच्या मुलभूत हक्कासाठी कटिबद्ध असुन 1098 हा नंबर लहान मुलांच्या मदतीसाठी 24 तास असल्याचे प्रतिपादन सह्याद्रि फाऊंडेशन्स चे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज यांनी केले.
सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद व चाईल्ड-लाईन यांच्या वतीने 1098 या टोल फ्री नंबरची जनजागृती कार्यक्रम वाखरवाडी ता.जि.उस्मानाबाद येथे घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी हनुमान मंदिराच्या मुर्तीस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ.स्नेहा गणेश पवार होत्या तर प्रमुख म्हणून पं.स.सदस्य संग्राम देशमुख,माजी सभापती दगडू ढवारे,बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए.डी .कदम,अदि,
उपस्थित होते. यावेळी डॉ.ए.डी.कदम यांनी बालरक्षा अभियानाची सविस्तर माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास माजी उपसरपंच मोहन शिंदे,पोलीस पाटील अजित शिंदे,रामा पवार,दादासाहेब थोरात, ग्रा.पं.सदस्य धनंजय शिंदे,नवनाथ सुरवसे,सौ.वैजींता शिंदे,रामेश्वर पवार,यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.