अडवाणींच्या बुद्धिमत्तेचे नेहमीच कौतुकः मोदी


वृत्तसंस्था, नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गुरुवारी ९१व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व जन्मदिनाचे अभिष्टचिंतन केले.

'भारताच्या विकासात अडवाणी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात असताना त्यांनी भविष्याचा वेध घेत अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. भारताच्या राजकीय वर्तुळात अडवाणी यांच्या बुद्धिमत्तेचे नेहमीच कौतुक केले जाते,' असे ट्विट मोदी यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यवर्धनसिंह राठोड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांनीसुद्धा अडवाणी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post