राज्य एकता सम्मेलन चे आयोजन


यवतमाळ: बंधूभाव आणि आपापसातील  आपसी सद्भाव यावरील संकट पाहता म. गांधी यांच्या 150व्या जयंती वर्ष निमित्त  ऑल इंडिया कौमी तंजीम, महाराष्ट्र विदर्भ विभाग द्वारा राज्य एकता सम्मेलनाचे आयोजन 2 डिसेंबर  2018 ला दुपारी 1 वाजता  शांती भवन नई तालिम बापू आश्रम, सेवाग्राम जिल्हा वर्धा येथे केले आहे. या  कार्यक्रम चे अध्यक्ष पुर्व केंद्रीय मंत्री आणि  राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया कौमी तन्जीम सांसद तारीक अनवर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून  महाराष्ट्र कांग्रेस कमेटी चे पूर्व अध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधीमंडळचे उपनेता आ.  विजय वडेट्टीवार, पुर्व राज्यमंत्री आ.रणजीतदादा कांबळे , आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार अमर काळे, राज्य अल्पसंख्याक आयोग चे   पुर्व अध्यक्ष मुनाफ हकीम, यवतमाळ जिल्हा  कांग्रेस चे अध्यक्ष आ.  डॉ.वजाहत मिर्झा, युवा स्वाभिमान चे अध्यक्ष विधायक रवी राणा, खामगाव चे  पुर्व आमदार राणा दिलीपकुमारजी सानंदा, प्रदेश असंघटीत कामगार कांग्रेस चे अध्यक्ष मोहम्मद बदरूज्मा उपस्थित राहतील. या  सम्मेलन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन ऑल इंडिया कौमी तन्जीम चे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद आसिम अली, वर्धा  जिलाध्यक्ष अब्दुल रहेमान तवर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मिर्झा वसिम बेग, अमरावती जिलाध्यक्ष अब्दुल रफिक पत्रकार, भंडारा  जिलाध्यक्ष मोहम्मद फजल पटेल, गडचिरोली  जिलाध्यक्ष शेख युनूस, अकोला  जिलाध्यक्ष शेख वसिम, बुलढाणा  जिलाध्यक्ष मोहम्मद नवेद अजहर बबलु पठाण, चंद्रपूर  जिलाध्यक्ष शेख जहेरूद्दीन उर्फ छोटूभाई यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post