इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद येथे भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ईद ए मिलादुनबी निमित्त मुस्लीम
बांधवाना शुभेच्छा दिल्या.
उस्मानाबाद भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक प्रमुख पदाधिकारी यांची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थित अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अतिक पटेल यांच्या निवासस्थानी घेण्यात अली.
यावेळी प्रथम भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व भाजपा उप जिल्हाध्यक्ष अँड.नितीन भोसले यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.आगामी कालावधी मध्ये होणाऱ्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी आरफत यांच्या दौऱ्याबाबत नियोजन करण्यात आले.भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी मुस्लिम भागातील अडचणी जाणून घेतल्या व त्यामध्ये अल्पसंख्यक वस्तीमधील नाली,रास्ते तयार करणे तसेच दिवा बत्ती लावणे विद्यार्थ्यांना शिषवृत्ति देणे,वस्तिगृह बांधणे,आर्थिक मदतीसाठी व्यवसाय लोन देने,मुद्रा लोन मिळण्याबद्दल च्या अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे,यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले.अल्पसंख्यांक कल्याण समिती मध्ये अशासकीय सदस्य पदी अतीक पटेल याची नियुक्ति झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.नितीन भोसले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अतीक पटेल,शहर सरचिटणीस नाना घाडगे उपाध्यक्ष मुशीर शेख,जिल्हा संघटन सरचिटणीस शरीफ शेख,सरचिटणीस फासियोद्दीन मनियार,चिटणीस रज्जाक शेख अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरगा मुस्तफा अब्दुल वहाब औटि,कळंब तालुकाध्यक्ष समीर बागवान, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष नासिरूद्दीन शेख,भूम तालुकाध्यक्ष मुस्तफा पठान,युवा मोर्चा चिटणीस सुल्तान शेख,अँड फिरोज शेख,यांच्यासह भाजपाचे अल्पसंख्याकचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
