इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लहुजी वस्ताद साळवे यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त उमरगा शहरातील सोनाई हाँटेल येथे उमरगा व लोहारा तालुक्यातील मातंग समाचे कार्यकर्ता शिबीर घेण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रा.
शिवाजीराव जवळगेकर तर प्रमुख म्हणुन ज्येष्ट कार्यकर्ते रावसाहेब सरवदे,उमरगा/लोहारा विधानसभेचे इच्छुक उमेदवार आशोक सरवदे,सतिष कसबे,दयानंद थोरात,सुखदेव कांबळे,बालाजी गायकवाड,संजय कांबळे,नेताजी गायकवाड,, संजय सरवदे,महादेव वाघमारे,राजाभाऊ शिंदे,विलास कांबळे, तुळशीराम देडे,आदि उपस्थित होते.
यावेळी डॉ.प्रा.शिवाजीराव जवळगेकर म्हणाले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमरगा/लोहारा तालुका विधानसभेची उमेदवारी मातंग समाजाच्या उमेदवाराला मिळावी,यासाठी समाजातील सर्व संघटनांनी एकत्र येवून जोर धरावा,कांही दिवसात विविध पक्षात काम करणाऱ्या पदाधिकारी व पदाधिकारी,कार्यकत्यांचा मातंग समाज राजकीय परिषद घेण्यात येईल,असे सांगीतले.या शिबिरास उमरगा,लोहारा तालुक्यातील मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
