मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — जिल्हाध्यक्ष हणमंत देवकते


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी मोठ्या संखयेने सहभागी व्हावे,असे अवाहाव जिल्हा अध्यक्ष हणमंत देवकते यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी दि.28 नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तरी या आंदोलनाच्या पुर्व तयारीसाठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत देवकते लोहारा येथे पोलीस पाटलांची बैठक घेऊन ते बोलत होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष सुर्यकांत पाटील होते. यावेळी प्रमुख म्हणुन तालुका सचिव संजय नरगाळे, जिल्हा उपाध्यक्षा मनिषा जगताप,ज्येष्ठ पोलीस पाटील शंकर पाटील, व्यंकट चौधरी- पाटील,जगन्नाथ हाके पाटील,लक्ष्मण गायकवाड पाटील,अदि उपस्थित होते.
     यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष हणमंत देवकते म्हणाले की,राज्यातील गाव कामगार पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भिकाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानात होणाऱ्या मोर्चासाठी सर्व पोलीस पाटलांनी उपस्थित रहावे असे आवाहन या बैठकीत केले.या बैठकीस नवनाथ साठे पाटील, तानाजी माटे, सुखराज पाटील,यांच्यासह लोहारा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post