महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झालेला गावात २९ शेतकरी विधवा आहे..
यवतमाळ , दि. ०७ :- आज दि. ०७ – ११ – २०१८ ला यवतमाळ तालुका व जिल्ह्यातील शेतकरीच्या आत्महत्यासाठी संपूर्ण भारतासह जगात नाव लौकिक असलेल्या बोथबोडन येथील एका तरूणाने दि. ०२ – ११ – २०१८ रोजी उल्हास तेजु राठोड याने सततच्या नापिकीला कंटाळुन आत्महत्या केली व तो अतिशय सौजन्यशिल व मनमिळावु असल्यामुळे सर्व गांवात हळहळ व्यक्त होत आहे .
सदर आत्महत्या दिवाळीच्या तोंडावर झाल्याने या गांवातील नागरिक दुःखी असुन या शेतकरच्या पश्चात एक मुलगा , मुलगी व पत्नी तसेच आई त्यांच्या वर एक लाख रुपयाचे बैंक कर्ज होते व ते माफी बसले नाही
व याच अनुषंगाने हि दिवाळी काळी दिवाळी साजरी करण्याचा निश्चय गांवातील शेतकर्याच्या चळवळीचे कार्यकर्ता माजी सरपंच अनुप चव्हाण यांनी आत्मकलेष सत्याग्रह आंदोलन करण्याचे आयोजन केले व
आज या बोथबोडन गांवात आम्ही या त्यांच्या दुःखात सहसंवेदना सहीत सहभागी होतो.