इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- कष्टकरी व वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हिच खरी दिपावली,असे प्रतिपादन डॉ. दापके-देशमुख दिग्गज यांनी केले.
सर्व साधारणपणे कुटुंबासोबत,मित्र मंडळीच्या भेटी घेत व त्यांना शुभेच्छांचे आदान-प्रदान करीत तसेच दिवाळी पहाट सारख्या संगीत मैफलींना हजेरी लावत दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे.
परंतु याला छेद देत,सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद यांच्यावतीने उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या 30 कुटुंबातील 90 सदस्यांना सामाजिक भावना जपत संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज व सचिव प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख यांनी मिठाई, फराळ,आकाशकंदील व पणती,अदि वस्तुंचे वाटप केले.यावेळी डॉ.दापके देशमुख दिग्गज बोलत होते.
ऊसतोड कामगार स्वतःच्या घरादारापासून लांब पोटाची खळगी भरण्यासाठी हातावर पोट घेवून उसाच्या फडात कोयता चालवणाऱ्या कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण पेरण्याच्या छोटासा प्रयत्न केला.
त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे हाच दिवाळीचा आनंद असल्याचे देशमुख दांपत्याने यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री चे गजानन पाटील,अभिजित माने,परमेश्वर माने,शिवाजी जाधव,
अदिंनी परिश्रम घेतले.