रत्नागीरी ते नागपुर जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपुलाखाली बोगदा करावा,या मागणीसाठी करजखेडा ग्रामस्थांचे चार तास रास्ता रोको आंदोलन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील ग्रामास्थांनी रत्नागिरी ते नागपूर जाणाऱ्या महामार्गावर करण्यात असलेल्या उड्डाणपुलाखाली बोगदा करून पर्यायी रस्ता देण्याच्या मागणीसाठी दि.23 नोव्हेंबर रोजी चार तास महामार्ग रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजुला दुर्तफा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.यामुळे प्रवाशाना याचा त्रास सहन करावा लागला.
         रत्नागिरी ते नागपूर महामार्गाच्या रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम सुरू आहे. हा महामार्ग करजखेडा चौरस्ता येथून जातो.या चौरस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.करजखेडचा विस्तार महार्गाच्या दोन्ही बाजूनी झाला आहे.गाव पूर्व व पश्चिम असे समान दोन भागात विभागले गेले आहे.गावातील शाळा, बाजार,शेतकऱ्यांच्या शेतजमीनी,सार्वजनिक पाणवठे हे पूर्वेकडील भागात असून बांधकाम चालू असलेल्या उड्डाण पुलामुळे पश्चिमेकडील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होणार असून भविष्यात अपघातामुळे नागरिकांच्या जिवितास धोका  निर्माण होणार आहे.त्यामुळे उड्डाणपुलाच्या खाली बोगदा करून पर्यायी व्यवस्था करणे अवश्यक असताना संबंधित यंत्रनेने  याकडे लक्ष दिले नाही. पुलाखाली बोगदा करण्याची मागणी सातत्याने करूनही संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बोगदा करण्याच्या मागणीसाठी तब्बल चार तास महामार्ग रोखून आंदोलन केले. जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तापर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.यावेळी उस्मानाबादचे नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी आंदोलनस्थळी येवून बोगदा होईपर्यंत पुलाचे काम बंद ठेवण्याचे संबंधित कंपनीस आदेश देऊन बोगद्याच्या मंजूरीचे लेखी आश्वासन दिले.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उपसरपंच बालाजी सुरवसे,माजी सरपंच नंदकुमार माळी,पैगंबर शेख,अमोल चव्हाण,सुभाष कळसुले,शाहुराज चव्हाण,सुधीर भोसले,प्रशांत मोरे,संजिवनी सुरवसे,लक्ष्मीबाई जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post