इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे यांच्या वतीने बार्टीचे महासंचालक कैलास कणसे(भा.प्र.से.),मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,सहाय्यक प्रकल्प संचालिका सुजाता पोहरे,प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान सप्ताह निमित्त दिनांक दि.27 नोव्हेंबर रोजी समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात येथे तर समतादूत किरण चिंचोले यांनी उमरगा येथील पोलीस ठाण्यात भारतीय संविधान भेट दिली.
यावेळी लोहारा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल बी.डी.काळे,पी.एस.क्षिरसागर,एस.पी. कांबळे,आर.एस.चव्हाण,उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.डी.भोसले,सी.सी. कोनगुलवार,एच.एम.पापुलवार,ए.एस.कांबळे,एन
एस.पाटील आदी उपस्थित होते.