लोहारा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेवुन अधिकाऱ्यांनी कामे करावीत — जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील दुष्काळी परिसस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे,अन्यथा कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन उस्मानाबाद जि.प.चे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी केले.
लोहारा शहरातील पं.स.च्या सभागृहात पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी जि.प.च्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार,पं.स.सभापती अश्विनी  पाटील,जि.प.सदस्या शितल पाटील,जि.प.सदस्या अश्विनी जवळगेकर,जि.प.सदस्या शोभा तोरकडे, जि.प.माजी सदस्य राहुल पाटील,नायब तहसीलदार रणजित शिराळकर,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,विज वितरण कंपनीचे शाखा अभियंता डी.आर. चिगुरे,सहाय्यक गटविकास  अधिकारी डॉ.जास्मिन शेख,लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता ए.बी.जगताप, ग्रामिण पाणीपुरवठा  उपअभियंता पी.पी.पाटील,
गटशिक्षणाधिकारी तबसुम सय्यदा,अदि उपस्थित होते.
यावेळी विविध समस्यांचे तक्रारी सरपंच व नागरीकांनी
या बैठकीत मांडल्या या तक्रारीचे तात्काळ अधिकाऱ्यांनी निराकरण करावे,अन्यथा कामात दिरंगाई केल्यास,आपल्यावर कारवाई करण्यात येईल, असे जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील यांनी सांगीतले.
या बैठकीस अँड.विश्वनाथ पत्रिके,जि.प.माजी सदस्य दिपक जवळगे,सरपंच मोहन पणुरे,पं.स.सदस्य वामन डावरे,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर परसे,पं.स.सदस्या हेमलता रणखांब,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अच्युत साठे,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी,शामसुंदर तोरकडे,राष्टवादी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,राष्टवादी शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,ग्रामसेवक,
सरपंच,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post