संविधान आमचा अभियान सभेचे आयोजन


यवतमाळ: मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर शाखा उमरखेडच्या वतीने येत्या 26 नोव्हे.ला संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधान दिवस  साजरा करण्यात येत आहे. देशाच्या सध्य परिस्थितीत राष्ट्रहीतकरीता संविधानाचा परिचय करून जागृती करणे तसेच संविधानाच्या सर्वसमावेशक तत्वीक व मुल्यात्मक  पायावर  राष्ट्राची उभारणी व्हावी ही यामागील भुमिका असून 24 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता संजोग भवन कवडशाबाबा रोड उमरखेड येथे एका सभेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अ्यक्ष प्रदेश अध्यक्ष मोहम्मद सिराज अहेमद असून जनरल सेक्रेटरी अफसर उस्मानी, प्रदेश सचिव अलताफ हुसेन, कार्यकारी अध्यक्ष सुराज्य सेना नांदेडचे फारूक अहेमद, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा.सैयद मोहसीन प्रामुख्याने उपस्थित राहतील. तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार भगवान कांबळे, पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड, मुख्याधिकारी गणेश चव्हाण, अॅड. संतोष जैन, प्रेम हनवते, दिपक ठाकरे, आनंद देशमुख, गुणवंत कुळकर्णी, आरीफ अबरार, शिवाजी देवसरकर, साहेबराव धात्रक, अब्दुल रऊफ नदवी, अॅड. अरमान शेख, सरोज देशुख, प्रा.निलोफर खान, सचिन जयस्वाल, जमिर सालम खान उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उमरखेड शहर अध्यक्ष शे.मोहसिन राज, कार्याध्यक्ष डॉ.फारूख अबरार, सचिव अब्दुल जहिर यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post