लोहारा शहरात पेशकार अशोक शिंदे व नगरसेवक तथा सर्पमित्र श्रीनिवास माळी (फुलसुंदर) यांचा सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तहसील कार्यालयाचे पेशकार अशोक शिंदे यांनी कार्यालयीन वेळेच्या व्यतीरिक्त तहसील परिसर  श्रमदान करुन स्वच्छ केल्याने व शहरातील नगरसेवक तथा सर्पमित्र श्रीनिवास माळी (फुलसुंदर) यांची
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या
व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणुन
नियुक्ती झाल्याबध्दल शहरात दि.19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी निसर्ग संवर्धन संस्था लोहारा यांच्यावतीने
या दोघांचा संयुक्त यथोचित सत्कार करण्यात आला.
 महाराष्ट शासन कृषी,पशुसंवर्धन,दुग्ध विकास व  मत्सव्यवसाय विभागाच्यावतीने उस्मानाबाद जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक (प्राणी क्लेष) प्रतिबंधक सोसायटी व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणुन लोहारा शहरातील नगरसेवक तथा सर्पमित्र श्रीनिवास माळी (फुलसुंदर) यांची महाराष्ट शासनाचे अवर सचिव विकास तु.कदम यांनी नियुक्ती केली आहे.या सत्कार कार्यक्रमास सहदेव काडगावे,
मनसे शहराध्यक्ष प्रविण संगशेट्टी,विरेश स्वामी,बालाजी शिंदे,रामेश्वर वैरागकर,बालाजी माळी,श्रीशैल जट्टे,
दयानंद स्वामी,अमोल फरीदाबादकर,जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष तथा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,राहुल कुलकर्णी,किशोर जगताप,पवन स्वामी,ज्ञानेश्वर लोखंडे,आयनोद्दीन सवार,मनसे विद्यार्थी अध्यक्ष अंकुश परीट,अमोल माळी,ज्ञानेश्वर लोखंडे,यांच्यासह शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post