इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका दुष्काळ घोषीत करावा,अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावार भाजपा जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य यांची सही आहे.
उमरगा मंडळात दि.8 जुन रोजी 208 मि.मि.,दि.22 जुन रोजी 146 मि.मि,दि.3 ऑक्टोंबर रोजी 81 मि.मि.पाऊस पडला तर मुरुम मंडळात 610 मि.मि.,
नारंगवाडी मंडळात 610 मि.मि,मुळज मंडळात 644 मि.मि,दाळींब मंडळात 753 मि.मि.पाऊस झाला आहे.
उमरगा मंडळाचा अपवाद वगळता तालुक्यात सर्व मंडळात पावसाचे प्रमाण अल्प आहे.यामुळे खरीपाच्या उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन अद्याप रब्बीची पेरणी झालेली नाही.पावसाळ्यात पाऊसाचे मोठे खंड आहेत.तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्य 7 तालुक्या प्रमाणेच उमरगा तालुका दुष्काळी घोषीत करावा,अशी मागणी निवेदनात केली आहे.