कार्यकर्त्यानी उत्साहानी कामाला लागावे — भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- कार्यकर्त्यांनी उत्साहानी कामाला लागावे,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले. कळंब तालुक्यातील नायगाव सर्कलची भाजपा कार्यकर्ता मेळावा बैठक पाडोळी येथे घेण्यात आली.या प्रसंगी ते बोलत होते.या मेळाव्यात  शेतकऱ्याचे,कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.यावेळी प्रमुख म्हणुन भाजपाचे लोकसभा संयोजक नितीन काळे,लातुरचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हणमंत नागटीळक,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.नितीन भोसले,कळंब भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील,अदि उपस्थित होते.
लातूरचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत नागटीळक यांनीही उपस्थित कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले कि,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या लोकहिताचे घेतलेले निणर्य हे जनसामान्यांपर्यंत पोहचवावे तसेच महाराष्ट्र शासन दुष्काळाबाबत करत असलेल्या उपाय योजनेची माहिती दिली.तसेच २०१९ साली नरेंद्रजी मोदी याना परत देशाचे पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यानी उत्साहाने कामाला लागावे असे आवाहन केले.व लोकसभा संयोजक नितीन काळे व लातूरचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत नागटीळक यांनीही उपस्थित कार्यकर्त्याना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी कळंब भाजपा तालुका सरचिटणीस संजय जाधवर,उस्मानाबाद व कळंब विधानसभा विस्तारक मकरंद पाटील,विष्णू काळदाते,रामराजे घोंगरे,देविदास देशमुख,बाळासाहेब टेकाळे,बाळासाहेब यादव,रमेश गुंड,उमेश चौधरी,गणेश मोरे,समीर बागवान,रमेश नाईकनवरे,नवनाथ मदने,सोमनाथ टिंगरे,गंगाधर कानडे,हनुमंत गरड,तात्या गोरे,शिवराज नायगावकर, प्रल्हाद गिराम,अजिंक्य टेकाळे,यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post