इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- ईस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत महंमद पैगंबर यांची जयंती (ईद ए मिलादुन नबी) लोहारा शहरात व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली.
महमद पैगंबर जयंतीनिमित्त ईदगाह मश्जिदमध्ये सकाळी सामुहीक कुरआन पठण,फतीहखानी करण्यात आले.सांयकाळी पाच वाजता ईदगाह मश्जीदपासुन जुलुस काढण्यात आला.हा जुलुसाचा प्रारंभ पेशमाम मैनोद्दीन शेख व जैन्नु सन्नाटे यांच्या हस्ते करण्यात आला.हा जुलुस आझाद चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महात्मा फुले चौक,शिवाजी चौक,
बसस्थानक मार्गे काढण्यात आला.महंमद पैगंबर जयंतीनिमित्त सकाळी सालाबाद प्रमाणे हाजी कै.हुसेनसाब मुल्ला यांच्या भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी नगरसेवक आरीफ खानापुरे,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,राष्टवादी कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी,नगरसेवक आतिक पठाण,आय्याज सवार,मोहीन चाऊस,
राष्टवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,
शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख,जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष तथा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,नजीर हेड्डे,
मिलाप मित्रमंडळ अध्यक्ष रहेमान (दादा) मुल्ला, राष्टवादी कॉग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुक्तार चाऊस,खाशिम मुल्ला,के.के.सामाजिक संघटना अध्यक्ष कुर्बान खुटेपड,आश्पाक शेख,आयनोद्दीन सवार,तलत खुटेपड,सरफराज इनामदार,जब्बार मुल्ला,ताजोद्दीन भोंगळे,महामुद सवार,फिरोज गवंडी, इरफान शेख,मोहीन चाऊस,ताहेर पठाण,जहीर खुटेपड,यांच्यासह मुस्लीम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

