इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षण विधेयक विधानसभेमध्ये मंजूर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, धाराशिवचे भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, लोकसभा संयोजक नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अनिल काळे,परंडा तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे यांनी मुंबई येथे विधानवाना मध्ये भेटून आभार मानले.