इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- युवा सेना लोहारा तालुका प्रमुख दिपक मुळे यांच्यावतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दि.16 नोव्हेंबर रोजी लोहारा शहरातील व तालुक्यातील पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा सेना लोहारा तालुका यांच्यावतीने शहरात पत्रकार निळकंठ कांबळे,बालाजी बिराजदार,
गिरीश भगत,जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष तथा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,पत्रकार संतोष बायस,यशवंत भुसारे, गणेश खबोले,महेबुब फकीर,संभाजी सुरवसे,अदिंचा
यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,विठ्ठल वचने पाटील, नगरसेवक आरीफ खानापुरे,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,विजय ढगे,अंकुश नारायणकर,राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,विलास जेवळीकर,यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
