अतुल नवघरे
लाखपुरी :- अर्चना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लाखपुरी येथे महात्मा गांधीजीची व लाल बहादुर शास्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय श्री. डोंगरे सर होते.प्राचार्य श्री. एस.डी.चव्हाण यांनी त्यांच्या भाषणा मधून विद्यार्थ्यांना सत्य , अहिंसा व स्वच्छेते विषयी महत्त्व सांगितले त्याच प्रमाणे श्री. नाचणे सर यांनी प्रास्ताविकपर भाषणा मधुन गांधीजींच्या स्वतंत्र्याच्या चळवळी विषयी व लाल बाहादुर शास्त्री यांचे शेती विषयी व शेतकरी बांधवांन विषयी विचार मांडले.अध्यक्षांनी आपल्या भाषणा मधून महात्माच्या गांधीजीच्या आंदोलना विषयी त्यामधे मीठाचा सत्याग्रह ,भारत छोडो आंदोलन इत्यादी माहीती सांगितली
.श्री.हरसुले सर यांनी सुत्रसंचालना मधून आइ स्टाईन यांनी गांधीजी विषयीविचार सांगितले.आइस्टाईन यांनी म्हटले की,असा हाडा मासाचा माणूस या भूतलावर कसा निर्माण झाला म्हणजे )इंग्रजांच्या जुलमी व अत्याचारी सत्ते विरूद्ध जाऊन अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वतंत्र मिळून दिले.या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा मधे यश संपादन केले व विभागीय स्तरावर निवड झाली त्यांचे प्राचार्यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी क्रीडा शिक्षक श्री. देशमुख सर व राजपुत सर यांचे सुध्दा अभिनंदन करण्यात आले.या वेळी कु. अंकिता गजानन हरसुले ,कु. सोनम संजय तामसे (वर्ग ७ वा ) व प्राजक्त गजानन हरसुले आणि कु. ईश्वरी सं तामसे (वर्ग ५ वा. ) या विद्यार्थ्यींनी गांधीचे शिक्षणा विषयी विचार व वेळेचे महत्त्व भाषणातून व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक श्री. राजपूत सर श्री . लहाने सर श्री. पोहणकर सर .श्री. अवघड सर श्री.. देशमुख सर कु. काळे मॅडम कु. पांडे मॅडम भुतळा मॅडम राजपूत मॅडम सोळंके मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी एस. डी. चव्हाण श्री. जनार्दन अंबाडे श्री .एस के इंगळे राजु खंडारे आणि रवि देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. ए . एस. अवघड यांनी केले.
