तकाऱ्यांवरील हल्ल्याचा शेतकरी संघर्ष समिती यवतमाळ च्या वतीने निषेध



  • दोषींवर तात्काळ कार्यवाही ची मागणी

यवतमाळ :- 2 ऑक्टोबर रोजी एकीकडे अहिंसेचे जनक स्व महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना दुसरीकडे न्याय हक्काच्या मागण्या किसान घाट दिल्ली येथे घेऊन जात असताना शेतकऱ्यांना कलम 133 चा अंबल करून दिल्ली च्या सीमा सील करून दिल्ली च्या बाहेर अडविण्यात तर आलेच सोबत इंग्रजांनाही लाजवेल अश्या प्रकारचा क्रूर लाठीमार अन्न दात्या शेतकऱ्यांवर करण्यात आला या बाबी चा निषेध म्हणून महामहिम राष्ट्रपतींच्या नावे यवतमाळ जिल्हाधिकारी श्री राजेश देशमुख यांना शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला.

देशातील शेतकऱ्यांना घटनात्मक मार्गाने आपल्या न्याय मागण्यांना मागण्याचा हक्क शेतकऱ्यांनी गमावला आहे काय? दिवसेंदिवस देशातील शेतकऱ्यांची स्थिती विदारक होत जातं असतांना शासन त्यास आधार देणे सोडून झोडपून काढत असेल तर देशाची लोकशाही धोक्यात येत असल्याची खंत यावेळी शेतकरी संघर्ष समितीने निवेदनातून केली.

जय जवान जय किसान चा नारा देणाऱ्या स्व लाल बहादूर शास्त्री ची जयंती च्या दिवसावर घडलेल्या या घटनेचा निषेध व्यक्त करीत तात्काळ दोशींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या वेळी संघर्ष समिती चे नानाभाऊ गाडबैले, प्रवीण देशमुख, अरुण राऊत, सुरेश चिंचोळकर, बालू पाटील दरने, अनिल गायकवाड, शशिकांत देशमुख, निखिल गायकवाड, महेश झाडे, अक्षय कुमरे, हर्षल मिलमिले, निशांत सायरे, आकाश पाली, नितीन लांजेवार, विशाल झाडे, अभिजित सोळंके, नितीन लाथेकर, यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post