इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील खेड येथील जि.प.प्रा.शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे.शिक्षण विभाग यांच्यावतीने जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा उस्मानाबाद शहरातील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत प्रत्येक तालूक्यातून एक संघ आपली नाटीका घेऊन सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेत लोहारा तालुक्यातील खेड येथील जि.प प्रा शाळेने पर्यावरण संवर्धन या नाटीकेची विभागीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यांना शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब इंगळे,सहशिक्षीका श्रीमती महानंदा चव्हाण,महादेव गव्हाळे,बालाजी साठे,कैलास माणिकशेट्टी,विक्रम लोमटे,रामदास कांबळे,शफीक गवंडी,या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबध्दल शाळेचे सरपंच यशवंत गरड,उपसरपंच सौ.अर्चना राठोड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडूरंग गव्हाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन केशव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रामलिंग कापसे, कापसे,यांच्यासह ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे.
