इकबाल मुल्ला
लाेहारा/प्रतिनिधी :- भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र योजनेअंतर्गत लोहारा तालुक्यासाठी मशीन उपलब्ध झाल्या असूनलोहारा तालुक्यातील मोघा बु.येथे जे.सी.बी.चे पुजन
आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करुन नाला सरळीकरण कामाची सुरुवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत लोहारा तालुक्यात 126 नाला खोलीकरण,184 शेततळी व 3 सिंचन तलावाची कामे प्रामुख्याने हाती घेण्यात येणार आहेत.यातून जवळपास 32 लक्ष क्यूबिक मीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट असून यातील पाण्यामुळे लोहारा तालुक्यातील 18 ते 20 हजार शेतजमीनीला याचा फार मोठा फायदा होणार आहे.तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी केले.या कार्यक्रमास गावातील व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
