इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हा कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 143 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. खंडेराव चौरे,अॅड.अनिल काळे,अॅड.अनिल काळे, ओबीसीचे संयोजक डॉ.गोविंद कोकाटे,भाजपा मीडिया विभाग जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड.नितीन भोसले,जिल्हा चिटणीस इंद्रजित देवकते,नगरसेवक बालाजी कोरे, दाजीआप्पा पवार,शहर सरचिटणीस नाना घाटगे, महेश काटे,विनायक कुलकर्णी,सुनील आंबेकर,मोहन खापरे,बालाजी जाधव,पांडुरंग पवार,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
