इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद अंतर्गत बी.ए,बी.काॅम व बी.एस.सी.प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षीच्या परीक्षा दि. 15 ऑक्टोबर पासुन सी.सी.टी.व्ही.च्या नियंत्रणात सुरळीत चालू आहेत.
या परीक्षा 100 % काॅपी मुक्त चालू आहेत. विद्यापीठीय स्तरावर हा काॅपी मुक्तीचा पहीला प्रयोग यशस्वी करून दाखवण्यात या महाविद्यालयाने यश प्राप्त केले आहे.या काॅपी मुक्त परीक्षाचा प्रयोग विद्यापीठ प्रशासनाने संपूर्ण महाविद्यालयास लागु करावा असे अनेक पथकातील सदस्यांनी आवाहन केले.व महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचे अभिनंदन केले.
या परीक्षा केंद्रावर 650 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.संपूर्ण परीक्षा दालनामध्ये सी.सी.टी.व्ही बसवण्यात आल्या आहेत.या विद्यापीठ परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.बिराजदार,उपप्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी (परीक्षा केंद्रप्रमुख),रजिस्टार भालचंद्र जाधव, विद्यापीठ प्रतिनिधी सह केंद्र प्रमुख डाॅ.राम कदम यांच्या नियंत्रणात सुरळीत चालू आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू यांनी काॅपी मुक्त परीक्षा संदर्भात सर्व महाविद्यालयातील प्राचार्य यांची बैठक घेतली होती.पण अंमलबजावणी काही मोजक्याच महाविद्यालयांनी केली.आमच्या महाविद्यालयाने 100 % काॅपी मुक्त परीक्षा मार्च 2016 पासुनच आमच्या संस्थेचे सरचिटणीस आ.सतिश (भाऊ) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केल्या आहेत.सर्व महाविद्यालयांनी काॅपी मुक्त परीक्षा घेऊन एक आदर्श शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केला पाहिजे,असे उपप्राचार्य
/ केंद्रप्रमुख प्रा.विरभद्रेश्वर स्वामी यांनी सांगीतले.

