इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी महेबूब बिस्मिल्ला मोमीन याने दिनांक 26 ते 28 आक्टोबर दरम्यान दक्षिण कोरियामधील सियोल या शहरात पार पडलेल्या 14 वर्ष वयोगटाखालील जागतिक सिकई मार्शल आर्ट या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधत्व करून सुवर्ण पदक पटकाविले. या विद्यार्थ्याने एयरोस्कोय व लोबो या या क्रीड़ा प्रकारामधे सिंगापुर,मलेशिया,चीन या तीन देशाच्या खेळाडूना अतिशय अटीतटीच्या सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकविले.या स्पर्धेमधे भारत,जपान,चिन,
सिंगापुर,मलेशिया,कजाकीस्तान,कंबोडीया,
उचबेकीस्तान,बांगला देश,अशा 19 देशांच्या खेळाडूनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे बक्षीस वितरण दक्षिण कोरियाचे अध्यक्ष चुंग व्हाटई,
आयोजन समितीचे सचिव मेरी किम,स्कॉय फेडरेशनचे सचिव मीर नजीर,अंतरराष्ट्रीय रेफरी महमदरफ़ी शेख,महाराष्ट्राचे अध्यक्ष मझहर खान आदि मान्यवरच्या हस्ते महेबुब मोमीन यास सन्मानचिन्ह व पारितोषक प्रदान करण्यात आले.
या विद्यार्थ्याचे लोहारा शहरात दि.31 ऑक्टोंबर रोजी आगमन होताच शहरातील शिवाजी चौकात फ़टाकयाच्या अतषबाजी करुन पेढ़े वाटून व सत्कार करुन स्वागत करण्यात आले.यावेळी नगरसेवक अयूब अब्दुल शेख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी,बिस्मिल्ला मोमीन,न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव,डॉ. कुंदन माकने,डॉ.अमलेश्वर गारठे,कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख,राष्ट्रवादी कॉग्रेस शहराघ्यक्ष आयुब हबीब शेख,जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला, अल्पसंख्याक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुक्तार चाऊस,प्रशिक्षक राहुल अम्बुरे,अदमशाह फकीर, आमीन सुंबेकर,आमीन कुरेशी,नावेद खानापूरे,तैय्यब पठान,लक्ष्मण सूर्यवंशी,बसवराज वकील,ताहेर मुल्ला,
यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
